शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबावरील दर्शन मंडप तब्बल चार वर्षे रखडला, हेरिटेज लूक देण्यासाठी नव्याने दगड बसविण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:30 IST

यंदाच्या चैत्र यात्रेलादेखील भाविकांना या अर्धवट काम झालेल्या इमारतीतूनच जावे लागणार

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या दर्शन मंडपाला हेरिटेज लूक देण्यासाठी त्यावर नव्याने दगड बसविण्यात येणार आहेत. हा मंडप तब्बल चार वर्षे रखडला आहे. त्यात आता दगडांमुळे आणखी सहा महिने लागणार आहेत. शिवाय कामाचा खर्च वाढला आहे. यंदाच्या चैत्र यात्रेलादेखील भाविकांना या अर्धवट काम झालेल्या इमारतीतूनच जावे लागणार आहे.जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हातान्हाचे थांबावे लागू नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने आवारात तीन मजली दर्शन मंडप उभारण्यात येत आहे. हनुमानाच्या शेपटीप्रमाणे या इमारतीचे काम लांबतच चालले आहे. कोरोनाच्या अगोदर याची वर्क ऑर्डर दिली होती. नंतर कोरोनात काम थांबले. आता ही महामारी संपून तीन वर्षे होत आली तरी दर्शन मंडप पूर्णत्वास आलेले नाही.जोतिबा मंदिर पुरातन असल्याने तेथे तयार होणाऱ्या नव्या वास्तूदेखील या मंदिराला साजेशा दगडी बांधकामातच होणे अपेक्षित होते. मात्र, तिथे तीन मजली आरसीसी इमारत उभी राहिली. ही इमारत मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधक ठरत होती. वास्तविक दर्शन मंडपाच्या मूळ आराखड्यात दगडी बांधकामच प्रस्तावित हाेते.मात्र, इमारत वेगाने पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ती आरसीसी पद्धतीने बांधण्याची सूचना केली. आता इमारत पूर्ण झाल्यानंतर मंदिर वेगळे आणि इमारत वेगळी दिसत आहे. ही चूक सुधारण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी आरसीसी इमारतीच्या दोन बाजूंना दगड लावण्यास सांगितले आहे. 

दगड घडविण्याचे कामसध्या दगड घडविण्याचे काम सुरू आहे. गिलावा केल्याशिवाय दगड लावता येत नाहीत. त्यामुळे गिलावादेखील केला जात आहे. तसेच खिडक्या बसवता येत नाहीत. हे काम पूर्ण व्हायला आणखी सहा महिने लागणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा