शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित बिलांसाठी कोल्हापुरात ठेकेदारांची वाहनांसह ‘बांधकाम’वर धडक, राज्यात २७ हजार कोटींची थकबाकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:52 IST

सोमवारी पुण्यातील मुख्य कार्यालयात आंदोलन

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधित राज्यातील ठेकेदारांनी प्रलंबित बिलांसाठी मंगळवारी कोल्हापूर विभागीय कार्यालयावर वाहनांसह धडक दिली. ढोल-ताशांच्या गजरात ठेकेदार आक्रमक झाले होते, बिले दिली नाही तर बँकांच्या तगाद्यामुळे आत्महत्या कराव्या लागतील, असा इशाराही संघटनांनी यावेळी दिला. सोमवारी (दि. २४) पुण्यातील मुख्य कार्यालयावर वाहनांसह धडक देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.राज्यातील ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या आदेशानुसार कामे पूर्ण केली आहेत. या कामांमध्ये बँकांसह इतर वित्तीय संस्थांकडून कोट्यवधींची कर्जे काढून गुंतवले आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कामांची बिले अदा केलेली नाहीत. राज्यातील चार लाख ठेकेदारांचे २७ हजार कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बँकांचे हप्ते थकले आहेत. खडी क्रशर, पुरवठादार, पेट्रोल पंप आदींचे पैसे थकले आहेत. मजुरांचे पगार अंगावर असल्याने ठेकेदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहावयास मिळत आहे.यापूर्वी बांधकाम विभागाला निवेदन देऊन अनेक वेळा प्रलंबित बिलांची मागणी केली होती. मात्र, मंगळवारी महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन, रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोल्हापूर, बिल्डर्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागावर पेव्हर, रोलर, जेसीबी, ट्रक घेऊन ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा काढला.मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे, सचिव संजीव वोरा, खजानीस दत्ताजीराव भोसले, मयूर भोसले, रमेश भोजकर, मिलिंद साखरपे आदी उपस्थित होते.

फुकट्यांना पैसे देता, मग आमचे का नाही?राज्य शासनाकडे विविध योजनांची नुसती खैरात वाटली जात आहे. लोकांना फुकट देण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, आम्ही कामे पूर्ण करून आमचे पैसे देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.‘बांधकाम’ हादरले..बांधकाम विभागात पहिल्यांदाच ठेकेदारांनी आक्रमकपणे आंदोलन केले. ढोल-ताशांचा गजर, शासनाच्या विरोधातील घोषणांनी बांधकाम विभाग हादरून गेले होते.७ टक्क्यांत काय भागवायचे?ठेकेदार आक्रमक झाल्यानंतर राज्य शासनाने सोमवारी प्रलंबित पैशांपैकी केवळ ७ टक्के अदा केले आहेत. मात्र, या पैशात कोणाला भागवायचे, असा सवाल संघटनेचे राज्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार