शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबा मूर्तीच्या संर्वधन प्रक्रियेला प्रारंभ, भाविकांना घ्यावे लागणार उत्सवमूर्तीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:32 IST

जोतिबा : महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी-रत्नागिरी (ता.पन्हाळा) येथील श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीच्या रासायनिक ...

जोतिबा : महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी-रत्नागिरी (ता.पन्हाळा) येथील श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली. शनिवार(दि. २५)पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून, भाविकांना या काळात उत्सवमूर्ती व प्राणकलशाचे दर्शन घेता येईल.श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील देवाची मूळ मूर्ती प्राचीन आणि दगडी आहे. गतवर्षी या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांना मूर्तीची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. या अहवालानुसार श्री जोतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार, मंगळवारपासून श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरवात झाली. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री जोतिबाच्या मूर्तीचे संवर्धन सुरू असल्याने भाविकांना जोतिबाच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा