शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
2
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
3
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
5
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
6
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
7
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
9
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
10
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
11
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
12
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
14
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
15
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
16
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
17
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
18
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
19
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
20
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाघाला फुटीने घेरले, जनाधार टिकवण्याचे आव्हान

By समीर देशपांडे | Updated: October 26, 2024 16:13 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ...

समीर देशपांडेकोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो’ असे म्हणून ठाकरे तरुणाईला भावेल अशा भाषेत विरोधकांचा पंचनामा करायचे. त्यावर फिदा होणाऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची संख्या वाढायला लागली. काँग्रेसअंतर्गत असणारे गट-तट, मतदारसंघातील तत्कालीन परिस्थिती अशा स्थितीत गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला आणि खालीही ठेवला. पण, शिवसेनेचा जिल्ह्यातील आवाज चढत राहिला. २०१४ साली इतक्या टिपेला गेला की १० पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. परंतु, २०१९ ला हाच आवाज क्षीण झाला. फुटीनंतर आता सेनेपुढे जनाधार टिकविण्यासाठी काम करावे लागेल. काँग्रेस नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून पारंपरिक मतदारसंघाला मगरमिठी घातल्यानंतर ती सोडविणे अजिबातच सोपे नव्हते. परंतु, याला छेद देत पहिल्यांदा १९९० मध्ये शाहूवाडीतून बाबासाहेब पाटील-सरुडकर आणि कोल्हापूर शहरातून दिलीप देसाई यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला.१९९५ ला शाहूवाडीतून संजय गायकवाड आणि कोल्हापूर शहरातून सुरेश साळाखे विजयी झाले. याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत संजय घाटगे शिवसेनेतून बाजी मारली. परंतु, १९९९ ला एकमेव सुरेश साळोखे विजयी झाले. २००४ साली शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला, तर इकडे शहरात मात्र राजघराण्याचे वलय आणि नवा चेहरा यामुळे मालोजीराजेंनी बाजी मारली. २००९ मध्ये मिणचेकर, क्षीरसागर जायंट किलर

  • २००९ मध्ये शिवसेनेने दहापैकी सहा जागा लढविल्या आणि त्यातील तीन जिंकल्याही. करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी बाजी मारली, तर विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली. 
  • शिवसेनेचा सुरुवातीचा प्रवास मिळेल त्यांना सोबत घेऊन झाला. शिवसेना फुटल्यानंतर आता शिंदेसेनेसमोर हा जनाधार टिकविण्याचे आव्हान आहे.

पाच वर्षांचा सुवर्णकाळ

  • २०१४ हे शिवसेनेसाठी सुवर्णकाळ ठरले. जिल्ह्यातील १० पैकी तब्बल ६ शिवसेना उमेदवार विजयी झाले आणि दोन्ही काँग्रेस पिछाडीवर गेल्या. या सहापैकी चौघेजण हे पारंपरिक राजकीय घराण्यातील नव्हते. परंतु, यातील नरके यांनी शेकापचा प्रभाव ओसरल्यानंतर ती जागा घेत आपले बस्तान बसविले. 
  • आबिटकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडून एक निवडणूक अपक्ष लढविली. नवा चेहरा, गतिमान संपर्क आणि समूहाची कामे करण्यावर भर देत त्यांनी बस्तान बसविले. 
  • कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन क्षीरसागर दोन वेळा आमदार झाले, तर सरुडकरांनी गरज असेल तेव्हा भगवा खांद्यावर घेतला. 
  • उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी सोडून घात साधली, तर डॉ. सुजित मिणचेकर यांनी पहिली संधी घेत नंतर दुसऱ्यांदा बाजी मारली.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरShiv Senaशिवसेना