शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Kolhapur: चांगभलंच्या गजरात रंगला जोतिबा यात्रेचा गुलाल, रणरणत्या उन्हातही लाखो भाविकांची मांदियाळी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 12, 2025 16:37 IST

पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन

कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा ऐट, त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहान भूक विसरणारे भाविक, महापूजा, अभिषेक, आरती, सायंकाळी पालखी सोहळा अशा पारंपारिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, शनिवारी पार पडली. रणरणत्या उन्हाचे चटके ही सुसह्य वाटावेत एवढ्या अपरिमित भक्तीचा, देव आणि भाविकांच्या भेटीचा हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना कृतार्थ भाव प्रकटला. संपूर्ण परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता.महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली. देवाच्या भेटीच्या ओढीने गेल्या बैलगाडी, पायी, वाहनांमधून आठ दिवसांपासून अखंड प्रवास करत असलेले भाविक डोंगरावर विसावले. मंदिराचा कळस बघताच जोतिबाच्या नावाचा गजर झाला. महापूजेनंतर देवाची सरदारी रुपातील सालंकृत पूजा शनिवारी पहाटे ४ वाजता देवाची काकड आरती, मुख प्रक्षालन झाले. त्यानंतर पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. महापूजेनंतर देवाची सरदारी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी साडे बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जोतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.मंत्री शंभूराज देसाईंना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेलेत्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विहे (जि. सातारा) येथील दुसऱ्या क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी सासनकाठीधारकांनी मंत्री शंभूराज देसाई यांना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेले. त्यांनी सासनकाठीला मानाचा फेटा अर्पण केला. त्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या मानाच्या १०८ सासनकाठ्या त्यांच्या अनुक्रमांकानुसार मिरवणुकीत सहभागी झाल्या. सायंकाळी साडे पाच वाजता पालखी सायंकाळी साडे पाच वाजता देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. रात्री आठ वाजता यमाई व जमदग्नींचा विवाह सोहळ्यानंतर भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता श्री जोतिबा देवाची पालखी मंदिरात परतणार. रात्रभर देवाचे दर्शन सुरू राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा