शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पाचगाव केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली, रात्रीच्या घटनेने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:26 IST

पाच वर्षांपासूनचे निर्लेखन प्रस्ताव प्रशासनाकडे धूळखात पडून

पाचगाव : येथील केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली असून फार मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि.१) रात्री दहा वाजता घडल्यामुळे जीवितहानी टळली.पाचगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेची पटसंख्या १७८ इतकी असून सध्या या शाळेत केवळ ४ शिक्षकांवर अध्यापन सुरू आहे. या शाळेच्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडेशाळा निर्लेखनाचे प्रस्ताव धूळखात पडले आहेत.मुलांची बैठक व्यवस्था दुसरीकडे कराकेंद्र शाळा पाचगावच्या जुन्या इमारतीच्या भिंती सततच्या पावसाने ढासळल्या. त्यामुळे मुलांच्या बैठक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. इमारतीच्या इतर भिंतीही पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासन अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन ढासळणाऱ्या भिंती यंत्रणेकडून बाजूला कराव्यात आणि मुलांची बैठक व्यवस्था चांगल्या ठिकाणी कशी होईल याचे नियोजन करावे, अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.

या शाळेचे स्ट्रक्चर ऑडिट करून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांना भेटून हा प्रस्ताव दिला होता. मात्र, प्रशासनाकडून प्रत्येकवेळी त्रुटी काढून पळवाट काढली जात आहे. शाळा सुरू असताना जर या भिंती पडल्या असत्या तर त्याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नाचे उत्तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने द्यावे. - संग्राम पाटील, माजी सरपंच, पाचगाव.