शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

खळबळजनक! इचलकरंजीत तरुणाचा निर्घृण खून, दोघा संशयितांकडे कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 14:09 IST

इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरातील एका निर्जनस्थळी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. उदय मधुकर गवळी (वय २५, रा. ...

इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरातील एका निर्जनस्थळी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. उदय मधुकर गवळी (वय २५, रा. रेणुकानगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.वखारभागात एका व्यापारी संकुलाच्या बाजूला मोठी मोकळी जागा पडीक आहे. त्याठिकाणी मोठमोठी झाडेझुडुपे उगवली आहेत. अशा निर्जनस्थळी उदय याचा काल, रविवारी (दि.१०) रात्री खून करण्यात आला. प्रथमदर्शनी डोक्यात हातोडा मारून डोके दगडावर आपटून त्याचा खून केल्याचे दिसून येते. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात नेला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, निरीक्षक महादेव वाघमोडे, आदींनी भेट दिली.या प्रकरणाचा तातडीने पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ताब्यात घेतलेल्यांकडे कसून चौकशी सुरू असून, सायंकाळपर्यंत याबाबतचा उलगडा होईल, असा अंदाज वाघमोडे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी