शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'गडहिंग्लज कारखान्याच्या संभाव्य तोट्याला ब्रिस्क कंपनीच जबाबदार, मंत्री मुश्रीफांनी काय मदत केली'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 12:58 IST

विरोधकांना कारखान्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी

गडहिंग्लज :बँकांची देणी व शासकीय कर्जासाठी वाढवून दिलेल्या २ वर्षांसह ४ वर्षे आधी कारखाना सोडल्यामुळे ४ वर्षातील कारखान्याच्या संभाव्य तोटयाला 'ब्रिस्क कंपनी'च जबाबदार आहे, असा आरोप आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.चालू हंगामातील तथाकथित १२ कोटींच्या तोट्यासह कारखान्याच्या वजन काट्याबाबत व मनमानी कारभाराबाबत विरोधी संचालकांकडून दिशाभूल सुरू आहे.परंतु,दोन- अडीच कोटींपेक्षा अधिक तोटा होणार नाही, असे स्पष्ट करतांनाच विरोधकांना कारखान्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.शिंदे म्हणाले,२०१३ मध्ये ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना 'ब्रिस्क'ला चालवायला दिला होता.परंतु, कंपनीकडून ३९ कोटी ७७ लाख मिळाले असून अद्याप ३ कोटी २६ लाख येणे आहेत.संचालक मंडळ आणि कंपनीत कोणताही वाद नसतानाही शासनाने एकतर्फी  कारखाना संचालकांच्या ताब्यात दिला.संचालक मंडळाच्या सर्वाधिकारानुसारच उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे व आपण कारखाना स्वबळावर सुरू केला आहे.परंतु, त्यात आजही अडथळे आणले जात आहेत. त्यांचा शोध व समाचार  सूज्ञ गडहिंग्लजकर नक्कीच घेतील.यावेळी संचालक अमर चव्हाण, संभाजी नाईक व बाळकृष्ण परीट, शशिकांत चोथे उपस्थित होते.

शिंदे म्हणतात..- मंत्री मुश्रीफ यांना मदतीसाठी भेटूनही ते नाकारतात. कारखाना वेळेवर सुरू होण्यासाठी त्यांनी काय मदत केली ?- 'ब्रिस्क'कडून कामगारांचे १४ कोटी व तोडणी वाहतूक कमिशन २५ टक्के येणे आहे.- सप्टेंबर २०१९ अखेरचा कामगार पगार कंपनी देईल, असे आश्वासन मुश्रीफांनी दिले आहे ते पाळणार का?- कारखान्याने कंपनीला २४ कोटी ६५ लाख देण्याचा सहकार सचिवांचा आदेश बेकादेशीर असून त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याचेच दुःख कंपनीला पाठिंबा देणाऱ्या संचालकांना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेHasan Mushrifहसन मुश्रीफ