नेसरी : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथून दहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सचिन सुरेश मंडलिक (वय ४०) या तरुणाचा मृतदेह रविवारी (३०) रात्री गावातील काजूच्या बागेतील आपटेवाडी शेतात विद्रूप अवस्थेत आढळून आला. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.याबाबत अधिक माहिती अशी, २१ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास कुणालाही न सांगता सचिन हा घरातून बाहेर पडला होता. उशिरापर्यंत घरी परतल्याने पत्नीने त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नव्हता आणि पुढे फोनही बंद होता. गेले वर्षभर तो अबोल व मानसिक स्थितीत वावरत होता. घरच्यांचे सगळीकडे उपचारासाठी प्रयत्न सुरू होते. त्याच्या अचानक गायब झालेल्या या घटनेनंतर मंडलिक कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी परिसरात सातत्याने शोधमोहीम सुरू ठेवली होती.दरम्यान, रविवारी सायंकाळी शेतकरी नाचणी कापणी करत असताना परिसरात तीव्र दुर्गंधी आल्याने संशय निर्माण झाला. भटक्या कुत्र्यांनी चाळण केलेल्या अवस्थेत दाट झाडीत एक देह आढळला. कुत्र्यांनी लचके तोडल्याने मृतदेहाचे फक्त हाडांचे अवशेष दिसत होते. शेतकऱ्यांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ पोलिस हजर झाले.सोमवारी सकाळी नेसरी पोलिस, वरिष्ठ फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वारकरी म्हणून ओळख असलेल्या सचिनच्या निधनाने नेसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सचिनच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे.गळ्यात चेन, रुद्राक्ष माळ मृतदेहाच्या गळ्यात सोन्याची चेन, वारकरी रुद्राक्ष माळ सापडली तर काही अंतरावर मोबाइल सापडल्याचे सांगण्यात आले. इचलकरंजी येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ, नेसरी ग्रामीण रुग्णालय, कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक, पोलिस स्टाफ यावेळी उपस्थित होता.
Web Summary : Sachin Mandlik, missing for ten days, was found dead in a cashew orchard near Arjunwadi. He was reportedly mentally distressed. Police are investigating the cause of death. A gold chain and Rudraksha beads were found on the body.
Web Summary : दस दिनों से लापता सचिन मंडलिक अर्जुनवाड़ी के पास एक काजू के बाग में मृत पाए गए। वह कथित तौर पर मानसिक रूप से परेशान थे। पुलिस मौत के कारणों की जांच कर रही है। शव पर सोने की चेन और रुद्राक्ष की माला मिली।