शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! जिच्यावर केले अंत्यसंस्कार, 'ती' रक्षाविसर्जनदिवशी झाली हजर; कोल्हापुरातील उदगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:14 IST

अंत्यसंस्कार केलेली महिला कोण

जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) : उदगाव (ता. शिरोळ) येथील बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह मिळाला. तिच्यावर अंत्यसंस्कारदेखील झाले. मात्र, रक्षाविसर्जनाच्या दिवशी ती गावाकडे परतल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे पोलिसदेखील अचंबित झाले. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आलेली ती महिला कोण? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.उदगाव (ता. शिरोळ) येथील संजना महेश ठाणेकर (वय ३७) या १९ जुलैपासून बेपत्ता झाल्याची नोंद २३ जुलैला जयसिंगपूर पोलिसांत झाली होती. मंगळवारी (दि.२९) निलजी बामणी (ता. मिरज जि.सांगली) येथील कृष्णा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती. मिरज पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसात दिली. त्यानंतर महेश ठाणेकर हे खात्री करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात गेले होते.नदीपात्रात मृतदेह सापडल्यामुळे फुगलेला चेहरा ओळखत नव्हता. त्यामुळे महेश यांनी अंगावरील कपडे, गालावरील तीळ व अन्य खुनांमुळे पत्नीचाच मृतदेह असल्याची खात्री केल्यानंतर तो मृतदेह ठाणेकर यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मंगळवारी रात्री उदगाव वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (दि. ३०) उदगाव वैकुंठधामात रक्षाविसर्जनही करण्यात आले.तर बुधवारी दुपारी संजना या उदगाव येथे बचतगटातील पैसे भरण्यासाठी आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर त्या लगेचच निघून गेल्या होत्या. ही माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा राबविली. प्रत्यक्षात महिला पोलिसांत हजर झाल्याने उपस्थित सर्वांनी डोक्याला हात लावला. पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता संजना हिने तासगाव व बारामती येथे गेल्याचे सांगितले. तिला पाहून घरच्यांनाही धक्काच बसला. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेली महिला कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसात हजर झालेल्या संजना ठाणेकर यांनी तासगाव व बारामती येथे गेल्याचा जबाब दिला आहे. अंत्यसंस्कार केलेली महिला ही दुसरीच असून याबाबतचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांकडून होणार आहे. - सत्यवान हाके, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर जि.कोल्हापूर