शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

Kolhapur: साडेसात एचपीवाल्यांना बिले, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:37 IST

वनहक्क कायद्याबाबतही चर्चा

कोल्हापूर : साडेसात एचपी मोटरला वीजबील माफ असताना जिल्ह्यातील अनेकांना वीजबिले आल्याच्या मुद्द्यावरून जिल्हा नियोजन समितीमधील वातावरण सोमवारी चांगलेच तापले. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दलही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामध्ये या दोन्ही विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, अरुण लाड, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांच्याकडून उपायुक्त (नियोजन) संजय मरकळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आमदार यड्रावकर यांनी वीजबिलाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शिरोळ तालुक्यातील अनेकांच्या मोटर साडेसात एचपीच्या असताना महावितरणकडे त्यांंची नोंद ८ एचपी आहे. त्यामुळे ही बिले आली आहेत. धनगरवाड्याकडील रस्ते आणि वीज पुरवठा याबाबतचा विषय पालकमंत्र्यांनीच उपस्थित केला. या दोन्ही विषयांवर जोरदार चर्चा झाली. याबाबत स्वतंत्र बैठका लावून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.आमदार महाडिक यांनी रिंग रोड परिसरात नवे रुग्णालय आणि नवीन वीज उपकेंद्रांसाठी दोन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार नरके यांनी अनेक गायरानच्या जागांवर वनखात्याने आपला दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात काम सुरू असले तरी वनहक्कमधून आलेल्या घरांच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

जमीन उपलब्ध करावीजिल्ह्यात अनेक भागात दरवेळी पूरस्थिती निर्माण होते. अशा वेळी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चा करताना शासनाच्या वन विभागाने, कृषी विभागाने आणि शेती महामंडळाने आपल्याकडील जमीन चाऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना हसन मुश्रीफ यांनी केली. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाला पूरस्थितीबाबत दैनंदिन माहिती सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या आणि जिल्ह्यातील धरणांमध्ये ७० टक्के साठा निर्माण झाल्यावर जागरूक राहून पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

शालेयस्तरावर भौतिक सुविधांसह गुणवत्तेवर भर द्याजिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविले जाणार असून, समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यानुषंगाने भौतिक सुविधांची निर्मिती होत असताना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विविध उपक्रमांतून तसेच प्रशिक्षणातून कामे हाती घ्यावीत, अशा सूचना सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या.

जरा लोकांमध्ये मिसळावन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करताना पालकमंत्री म्हणाले, जरा लोकांमध्ये मिसळून काम करा. वनहक्क कायदा आणि त्यातील योजना याबाबत प्रसिध्दी करा. लोकांना या योजना समजावून सांगा. वरवरची कामे नकोत.