सकल मराठा समाजातर्फे ‘लोकमत’चे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:09 IST2017-08-11T04:09:01+5:302017-08-11T04:09:01+5:30
‘मराठा क्रांती मोर्चा’चे ‘उत्कृष्ट वार्तांकन’ केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’चे अभिनंदन करून सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

सकल मराठा समाजातर्फे ‘लोकमत’चे आभार
कोल्हापूर : ‘मराठा क्रांती मोर्चा’चे ‘उत्कृष्ट वार्तांकन’ केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’चे अभिनंदन करून सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
मोर्चाच्या नियोजनापासून ते मुंबईतील मोर्चा यशस्वी होईपर्यंत ‘लोकमत’ने त्याचे उत्कृष्टपणे वार्तांकन केले. मोर्चासंबंधीची बित्तंबातमी तळागाळातील मराठा समाजापर्यंत पोहोचली. हा भव्यदिव्य मोर्चा यशस्वी होण्यासाठीही हातभार लागला, अशी भावना सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर शहर कार्यालयाला दिलेल्या भेटीत बोलून दाखविली. तसेच पत्राद्वारे आभारदेखील मानले आहेत.