शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत होणार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:17+5:302021-05-19T04:23:17+5:30
आस्थापनाबरोबर किराणा, मेडिकल व्यावसायिकांची होणार तपासणी शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ...

शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत होणार चाचण्या
आस्थापनाबरोबर किराणा, मेडिकल व्यावसायिकांची होणार तपासणी
शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याबाबत आदेश दिले आहेत. हातकणंगले तालुक्यात दररोज तीन हजार व शिरोळ तालुक्यात दोन हजार चाचण्या करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चाचण्या केल्यानंतर निदान लवकर होणार आहे. पर्यायाने मृत्यू रोखण्यासदेखील मदत होणार आहे. त्यानुसार शासकीय पातळीवरील सर्व आस्थापना विभाग यामध्ये सहकारी संस्थेमधील कर्मचारी, कृषी केंद्र कर्मचारी, पिग्मी एजंट, दूध वाटप करणाऱ्या व्यक्ती, किराणा दुकानदार, मेडिकल शॉपमधील कर्मचारी, लहान- मोठ्या कारखान्यांतील कामगार, भाजीपाला विक्रेते, बाजार समितीतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक व विविध आस्थापनांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत. याबाबतचा अहवाल ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत एकत्रित करण्यात यावा, असा आदेश तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.