तृत्तीय पंथियावर खूनी हल्ला व्हिनस कॉर्नर येथील घटना : अज्ञात सात ते आठ जणांचे कृत्यकोल्हापूर : व्यावसायिक वादातून तोंडाला स्कार्प बांधून आलेल्या सात ते आठ अज्ञात व्यक्तिंनी तृत्तीय पंथियावर खूनी हल्ला केला. अभिजित वसंतराव साखरे (वय ४६, रा. कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने गंभीर दूखापत झाल्याने सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ही घटना व्हिनस कॉर्नर येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले, अभिजित साखरे, त्याची मैत्रीण प्रेमी आंबी, मनिषा प्रकाश शिंदे असे तिघेजण मंगळवारी मध्यरात्री व्हिनस कॉर्नर येथील डायग्नोस्टीक रुग्णालयाच्या दारात बसले होते. यावेळी सात ते आठ तरुण मोटरसायकलवरुन तोंडाला स्कार्प बांधून आले. त्यांनी थेट अभिजितला मारहाण केली. यावेळी भितीने आंबी व मनिषा पळून गेल्या. डोक्यात दगड मारल्याने अभिजित गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर आंबी हिने अभिजितला सीपीआरमध्ये दाखल केले. व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. प्रेमी आंबी हिने राजेंद्रनगर येथील तरुणांनी मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार लक्ष्मीपूरी व शाहूपुरी पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
तृत्तीय पंथियावर खूनी हल्ला
By admin | Updated: March 8, 2017 16:18 IST