शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

अपयश लपविण्यासाठीच सरकारी यंत्रणांची दहशत, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:50 IST

भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्राच्या खाईत ढकलत आहे

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, आपले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, राजकीय नेत्यांना खोट्या खटल्यात अडकविण्याचा उद्योग सुरू आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील वारे वसाहत व सिद्धार्थनगर येथील प्रचारसभेत बोलताना केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सभेत चव्हाण यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्र्याच्या खाईत ढकलत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी यांना सरकार चालवायला जमत नाही. सरकारी विमान कंपन्या, विमानतळ, रेल्वे, सरकारी जमिनी विकायचे काम सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना नेहमी फसवू शकत नाही. जनता आता शहाणी झाली आहे. भाजपची सत्ता उधळून लावण्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

वैचारिक राजकारण करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर जाऊन विरोधक टीका करू लागल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या आणि देशात खासगीकरणाद्वारे फक्त अंबानी, अदानी यांना मोठे करणाऱ्या भाजपला मते मागण्याचा हक्क राहिलेला नाही, कोल्हापूरची ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, भाजपने ती करून दिली नाही. परंतु छत्रपती ताराराणीची ही भूमी आहे. त्यामुळे जयश्री जाधव यांना आमदार करून ताराराणीचा वारसा जपला जाईल, असे त्या म्हणाल्या.

गोरगरिबांच्या संकटकाळी धाऊन जाणाऱ्या चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्याकरिता जयश्री जाधव तुमच्या समोर आल्या आहेत, त्यांच्या विजयात सिद्धार्थनगरचा वाटा मोठा असेल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार जयंत आसगावकर, जयश्री जाधव, वसंत लिंगनूरकर यांची भाषणे झाली. निशिकांत सरनाईक, सुशील कोल्हटकर, जय पटकारे, लता कदम, शारंगधर देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा