शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून मोरेवाडीत नंग्या तलवारी घेऊन दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:14 IST

शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून सातजणांनी नंग्या तलवारी नाचवत तरुणांसह दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पाचगाव येथे घडला. या प्रकाराची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.

ठळक मुद्देजमीनवाटणीच्या वादातून मोरेवाडीत नंग्या तलवारी घेऊन दहशतमोटारीतून येऊन हल्ला; दोघांना मारहाण; सातजणांवर गुन्हा

कोल्हापूर : शेत, घर, जमीनवाटणीच्या वादातून सातजणांनी नंग्या तलवारी नाचवत तरुणांसह दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पाचगाव येथे घडला. या प्रकाराची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.

याबाबतची तक्रार जखमी ओंकार सदाशिव मोरे (वय ३२, रा. सावकार कॉलनी, मोरेवाडी) यांनी दिली. या प्रकरणी अमोल महादेव मोरे, दत्तात्रय शामराव मोरे, अमोल प्रकाश जाधव, अमित कृष्णात कोईगडे व इतर तिघेजण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती, ओंकार मोरे हे मोरेवाडी (ता. करवीर) येथील सावकार कॉलनीत राहतात. त्यांच्या शेतीच्या व घराच्या वादातून मंगळवारी (दि. १२) सकाळी संशयित अमोल मोरे, दत्तात्रय मोरे, अमोल जाधव, अमित कोईगडे (सर्व रा. मोरेवाडी) व बाळासाहेब मोरे यांचे जावई (पूर्ण नाव नाही) यांसह अन्य दोघे असे एकूण सातजण दोन आलिशान मोटारी व दुचाकीवरून सावकार कॉलनीत आले. सर्वांच्या हातांत नंग्या तलवारी होत्या. त्यांनी प्रथम परिसरात दहशत माजवली.

ओंकार व त्याच्या चुलत्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्‍यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. काही वेळ दहशत माजविल्यानंतर हे हल्लेखोर एक आलिशान मोटार व दुचाकी घटनास्थळी टाकून पळून गेले.

घटनेनंतर जखमी ओंकार याने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये त्या हल्लेखोरांपासून आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार सात संशयितांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस