शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ट्रक-बोलेरोची धडक होऊन भीषण अपघात: ३ तरुणांचा जागीच मृत्यू; चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 09:16 IST

अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

सोळांकुर: निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात सोळांकुर (ता. राधानगरी) येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर झाले आहेत.

राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (२८), आकाश आनंदा परीट (२३) आणि रोहन संभाजी लोहार (२४) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळाहून मिळेलेली माहिती अशी की, ११ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (क्रमांक केए२८ AA ८२०६) ने  बोलेरो ( MH 42 H ३०६४) हिला समोरून धडक दिली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार, सर्वजण रा. सोळांकुर, हे जागीच ठार झाले, तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार (वय ४१, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.  अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.  अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात