श्रीपूजक-देवस्थानसाठी ‘पुरातत्त्व’च्या अटी

By Admin | Updated: July 31, 2015 23:51 IST2015-07-31T23:51:09+5:302015-07-31T23:51:09+5:30

अंबाबाई मूर्ती संवर्धन : दोन दिवसांत अधिकृत यादी संबंधितांना, सहा महिन्यांनी होणार पाठपुरावा

The terms of 'archaeological' for Shreepukas-Devasthan | श्रीपूजक-देवस्थानसाठी ‘पुरातत्त्व’च्या अटी

श्रीपूजक-देवस्थानसाठी ‘पुरातत्त्व’च्या अटी

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी श्रीपूजक व देवस्थान समितीने कोणत्या नियम व अटींचे पालन केले पाहिजे, याबाबत पुरातत्त्व खात्याने सूचना यादी तयार केली आहे. या सूचनांचे पालन केले गेले की नाही, याचा पाठपुरावाही सहा महिन्यांनी घेण्यात येणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाचे काम होत आहे. मात्र, हे संवर्धन दीर्घकालीन राहावे आणि देवीची मूर्ती अशीच अबाधित राहावी यासाठी विशेषत: श्रीपूजकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे; तसेच मूर्र्तीवर विघातक परिणाम करणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे टाळल्या पाहिजेत, याबाबत केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्यावतीने दहा अटी घालण्यात येणार आहेत. संवर्धन प्रक्रियेनंतर या दहा अटींचे काटेकोरपणे पालन होत आहे की, नाही याचा पाठपुरावादेखील करण्यात येणार आहे.
गेल्या सहा दिवसांपासून मूर्र्ती संवर्धन प्रक्रिया अतिशय योग्य प्रकारे सुरू आहे. पहिल्या दोन दिवशी मूर्र्तीची स्वच्छता आणि डिझाईन करण्याचे काम झाले; तर त्यानंतरच्या दोन दिवसांत मूर्तीवरील पूर्र्वीचा लेप काढण्यात आला. शुक्रवारपासून बिब्ब्याचे तेल आणि बेहडा व दूर्वांच्या अर्कापासून बनविलेला सेंद्रिय द्रव मूर्तीमध्ये सोडण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या तीन दिवसांत मूर्र्ती संवर्धनाच्या प्रक्रियेचे काम पूर्ण होणार आहे. मात्र, संवर्धन प्रक्रियेनंतरही मूर्तीची काळजी घेण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासन, देवस्थान समिती आणि श्रीपूजक यांची आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, याबाबत तज्ज्ञ समितीने सूचनांची यादी तयार केली आहे. येत्या दोन दिवसांत अधिकृतपणे ही यादी संबंधितांना दिली जाईल. ( प्रतिनिधी)

अंबाबाई मूर्र्ती संवर्धनाची जबाबदारी आमची असली, तरी त्यानंतर मूर्र्तीच्या टिकाऊपणावर परिणाम करणाऱ्या गोष्टींची काळजी देवस्थान व श्रीपूजक यांनीच घ्यावयाची आहे. त्यासाठी काही सूचनांची यादी तयार करण्यात आली आहे. या गोष्टी पाळल्या जात आहेत की नाहीत याबाबत केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे सहा महिन्यांनी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
- मनेजर सिंग,
पुरातत्त्व विभाग अधिकारी


अशा आहेत अटी व सूचना
गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी तेथील पाण्याचा साठा काढून टाकला पाहिजे.
गाभाऱ्यातील लाकडी चौकट काढून टाकण्याची गरज
गाभाऱ्यात निर्माल्य व फुलांचा साठा ठेवू नये.
गाभाऱ्यात पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवू नयेत.
चांदीची प्रभावळ काढून टाकावी किंवा त्यावर सोन्याचा मुलामा द्यावा.
गाभाऱ्यातील चांदीच्या वस्तू, चौथरा व पायरी यांवर सोन्याचे पाणी द्यावे.
गाभाऱ्यात अधिकाधिक पाच श्रीपूजकांनीच थांबावे.
पूजेसाठी दुधाचा वापर करायचा झाल्यास फक्त गायीचे दूध वापरावे.
दर्जेदार मधाचाच वापर करावा.
साडी व नित्यालंकार कमीत कमी वजनाचे असावेत.

Web Title: The terms of 'archaeological' for Shreepukas-Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.