कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगावात स्ट्राँग रूमसमोरील खासगी सीसीटीव्ही कॅमेरे काढल्याने तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी आज, बुधवारी विधीमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा गंभीर प्रश्न उपस्थित केला. पेठ वडगाव नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. यावेळी मतदानासाठी वापरलेली मतदान यंत्रे मराठा सांस्कृतिक भवनात ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते. मात्र प्रशासनाने व पोलिस विभागाने हे कॅमेरे काढून टाकली आहेत. तसेच स्ट्राँगरूमच्या अगदी समोर 'मोरे' नावाच्या व्यक्तीचे घर आहे. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराला सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. येथील मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात ते खासगी सीसीटीव्ही काढून टाकले...यामुळे संशय एखाद्या नागरिकाने स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार प्रशासनाला कसा काय असू शकतो? यामुळे ईव्हीएम प्रक्रियेवर संशय निर्माण होण्यास वाव मिळतो. प्रशासनाची ही बेबंदशाही चालू असून, याची चौकशी करावी आणि हे काढलेले सीसीटीव्ही तातडीने पुन्हा बसवण्याचे आदेश सरकारने द्यावेत असा सुचना केल्या. याला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.
Web Summary : Tension arose in Peth Vadgaon after CCTV cameras near a strong room were removed. MLA Satej Patil raised concerns in the assembly, demanding an inquiry and reinstatement of the cameras to ensure transparency during the EVM process. Minister assured investigation.
Web Summary : पेठ वडगांव में स्ट्रांग रूम के पास से सीसीटीवी कैमरे हटाने के बाद तनाव उत्पन्न हो गया। विधायक सतेज पाटिल ने विधानसभा में चिंता जताई और ईवीएम प्रक्रिया के दौरान पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए जांच और कैमरों की बहाली की मांग की। मंत्री ने जांच का आश्वासन दिया।