शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आर्थिक वादातून अभिषेक मिलसमोर मोठा तणाव, गेटवर आवाडे गटाच्या कामगारांचा ठिय्या; मोठा पोलिस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:58 IST

गोकुळ शिरगाव : तामगाव (ता. करवीर) हद्दीतील हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी माजी आमदार ...

गोकुळ शिरगाव : तामगाव (ता. करवीर) हद्दीतील हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी मिलचे प्रवेशद्वार उघडून आत घुसण्याचा प्रयत्न बुधवारी (दि. २९) केला. मिलचे कर्मचारी आणि आवाडे कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वारावरच शाब्दिक बाचाबाची. मात्र, प्रकरण टोकाला जाण्याअगोदरच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.मंगळवारी मिलच्या प्रवेशद्वाराचे कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा, मला कोण काय करते बघूयाच, असे माजी आमदार आवाडे बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचा भाग म्हणून दुसऱ्या दिवशी बुधवारी आवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मिलचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांच्याकडे आवाडे यांनी २०१९ पूर्वी ६ ते ८ कोटी रुपये मिलमध्ये गुंतवल्याचे बोलले जाते. दिलेल्या पैशांसाठी मोहिते यांना फोन केला असता उत्तर न दिल्याने व्याजासह पैसे मागणीवरून हा वाद झाला. ही मिल २०२३ पासून बंद आहे. त्यामुळे सुमारे ६०० कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

वाचा- मला कोण काय करते बघूयाच; जुनी देणी वसुलीसाठी कोल्हापुरातील माजी आमदार अभिषेक मिल्समध्ये घुसले, व्हिडीओ व्हायरलदेवघेव प्रकरणावरून मोठा वाद झाला. दोनशेहून अधिक लोक मिलच्या बाहेर तटस्थ थांबून होते. मिलमध्ये कोणीही घुसू नये म्हणून ट्रक आणि ट्रॉलीची चाके काढून आत प्रवेशद्वाराला वाहने लावली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास वातावरण तणावपूर्ण बनले. लोकांची गर्दी अधिक वाढल्याने करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्यासह जलद कृती दलाची तुकडी तत्काळ दाखल झाली. तब्बल पाच तास मिल परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडे