कोल्हापुरात शाहू छत्रपती समर्थक व शिंदेसेना पदाधिकाऱ्यांमधील घोषणांनी तणाव, शाहू छत्रपतींवरील टीकेचे पडसाद

By राजाराम लोंढे | Published: April 13, 2024 05:11 PM2024-04-13T17:11:29+5:302024-04-13T17:12:10+5:30

पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत

Tension between Shahu Chhatrapati supporters and Shindesena office bearers in Kolhapur | कोल्हापुरात शाहू छत्रपती समर्थक व शिंदेसेना पदाधिकाऱ्यांमधील घोषणांनी तणाव, शाहू छत्रपतींवरील टीकेचे पडसाद

कोल्हापुरात शाहू छत्रपती समर्थक व शिंदेसेना पदाधिकाऱ्यांमधील घोषणांनी तणाव, शाहू छत्रपतींवरील टीकेचे पडसाद

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले असून, शाहू छत्रपती यांचे समर्थक व शिंदेसेना पदाधिकारी उत्तरेश्वर पेठ चौकात एकत्र आल्याने शनिवारी तणाव निर्माण झाला. अचानक घडलेल्या प्रकाराने वाहतूक ठप्प झाली होती, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले.

खासदार मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्याचे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत. शनिवारी सकाळी उत्तरेश्वर पेठ येथे शाहू छत्रपती समर्थक एकत्र आले होते. त्यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यासाठी शिंदेसेनेचे पदाधिकारी जात होते. काँग्रेस समर्थकांनी शाहू छत्रपती यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

शिंदेसेनेचे पदाधिकारी त्याच चौकात थांबले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिक यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या मार्गावरून जाणारी वाहने थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना तेथून घालवले.

Web Title: Tension between Shahu Chhatrapati supporters and Shindesena office bearers in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.