‘इंजिनिअरिंग’च्या अध्यक्षपदी तेंडुलकर यांची फेरनिवड
By Admin | Updated: November 10, 2014 00:45 IST2014-11-10T00:41:14+5:302014-11-10T00:45:51+5:30
उद्यमनगर येथे प्रदूषण चाचणी आणि नियंत्रण प्रयोगशाळेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे़

‘इंजिनिअरिंग’च्या अध्यक्षपदी तेंडुलकर यांची फेरनिवड
कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी रवींद्र तेंडुलकर, तर उपाध्यक्षपदी संजय अंगडी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. रविवारी असोसिएशनच्या संचालक मंडळाची बैठक ज्येष्ठ संचालक रामप्रताप झंवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ या बैठकीत ही निवड करण्यात आली़ बाबासाहेब कोंडेकर यांची सचिवपदी, सहसचिवपदी नितीन वाडीकर, तर खजानीसपदी कमलाकांत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली़ असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘कोल्हापूर उद्यमवार्ता’ या पाक्षिकाच्या संपादकपदी नितीन वाडीकर यांची फेरनिवड करण्यात आली़ यावेळी रवींद्र तेंडुलकर, बाबासाहेब कोंडेकर, नितीन वाडीकर, कमलाकांत कुलकर्णी, रामप्रताप झंवर, देवेंद्र ओबेरॉय, श्रीकांत दुधाणे, प्रकाश चिरणे, विजय कामते, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते़ दरम्यान, असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले रवींद्र तेंडुलकर यांनी फौंडी क्लस्टरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच उद्यमनगर येथे प्रदूषण चाचणी आणि नियंत्रण प्रयोगशाळेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे़