प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबीयांनी नृसिंहवाडीत दत्त दर्शन घेतले. पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर याने दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होत श्री चरणी प्रार्थना केली.आज, बुधवारी सकाळी मुंबईहून विमानाने तेंडुलकर कुटुंबीय कोल्हापुरात साडे दहा वाजता आले. यावेळी विविध ठिकाणी भेटी घेऊन ते नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरात आले होते. श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. तेंडुलकर कुटुंबाला बघायला चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी दत्त महाराजांची प्रतिमा देऊन तेंडुलकर कुटुंबाला प्रसाद भेट दिला. नवल खोंबारे यांनी मंदिराची माहिती दिली. त्यानंतर येथील टेंबे स्वामी मठात जाऊन त्यांनी ही दर्शन घेतले त्यानंतर कोल्हापूरकडे प्रयाण झाले.
तेंडुलकर कुटुंबीय कोल्हापुरात, नृसिंहवाडीत घेतले दत्त दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:19 IST