शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘केशवराव’च्या दुसऱ्या टप्प्यातील सव्वा तीन कोटींची निविदा मंजूर, पुढील आठवड्यात होणार कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:08 IST

कामाचा ठेका व्ही.के. पाटील यांना : ७.८८ टक्के कमी दराची निविदा मंजूर

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी २२ लाख रुपयांच्या कामाची निविदा मंजूर झाली असून, कोल्हापूरस्थित ठेकेदार व्ही.के. पाटील यांना काम देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रसिद्ध करण्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जतन, संरक्षणअंतर्गत भिंती, तसेच छताचे अतिशय अवघड असे पहिल्या टप्प्यातील काम गतीने सुरू आहे, लवकरच ते पूर्ण होईल. आता दुसऱ्या टप्प्यातील कलादालनजवळील मेकअप रूम, ग्रीनरूम, ऑफिस, टॉयलेट, बाथरूम, बाजूचे दोन व्हरांडे, खासबाग मैदानाकडील भिंतीचे काम, छत, दरवाजे, खिडक्या, दोन जिने आणि स्टेजचे बांधकाम केले जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी नऊ ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या, त्यापैकी अंतिम निवडीपर्यंत सात ठेकेदार पात्र ठरले. त्यातून कोल्हापुरातील नामवंत ठेकेदार व्ही.के. पाटील यांनी ७.८८ टक्के कमी दराची निविदा भरल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. ठेकेदार पाटील यांचा कामाचा अनुभव चांगला आहे. त्यांनी याआधी केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण केले होते. छत्रपती शाहू समाधी स्मारकाचे काम त्यांनी केले आहे. ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंग इमारतीचे कामही तेच करत आहेत.निविदा मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम प्रस्ताव उपसमितीकडे पाठविण्यात आला असून, पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता झाल्यावर कामाला सुरुवात केली जाणार आहे. या कामाची मुदत तीन महिने आहे. ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संयुक्तपणे भेट देऊन काय काय कामे करायची आहेत, यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अभियंता मिलिंद पाटील यांनी सांगितले.दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील कामही तितक्याच गतीने व्हावे, म्हणून या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. निविदा काढण्यास मान्यता झाली आहे.

११ कोटी ७७ लाखांची होणार कामेकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी बुधवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ११ कोटी ७७ लाख रुपयांच्या या कामात नाट्यगृहाच्या आतील भागात इंटेरियल, ॲकॉस्टिक (ध्वनिक), विद्युतीकरणासह अनुषंगिक कामांचा समावेश आहे. निविदा मागविणे, निविदापूर्व बैठक, प्राप्त निविदांची छाननी करणे, निगोसिएशन आदी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यास पुढील एक महिना लागणार आहे. तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर