शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह चौथ्या टप्प्याची निविदा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:23 IST

नऊ कोटींमध्ये रंगमंच, विद्युतीकरण, दृक्श्राव्य व्यवस्था

कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या चौथ्या टप्प्यातील कामांसाठी नऊ कोटी रुपयांची निविदा गुरुवारी जाहीर करण्यात आली. या टप्प्यात स्टेजची रचना, आधुनिक ऑडिओ-व्हिडीओ सिस्टम, संपूर्ण विद्युतीकरण आणि प्रेक्षकांसाठी खुर्च्यांच्या व्यवस्थेचा समावेश आहे. शहर अभियंता कार्यालयाने ही निविदा प्रसिद्ध केली आहे.केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून ते जळल्यानंतर नव्याने नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. या नाट्यगृहाच्या उभारणीचे काम चार टप्प्यांमध्ये विभागले गेले. पहिल्या टप्प्यात नाट्यगृहाची संकल्पना, आराखडा तयार करणे आणि प्राथमिक बांधकाम, दुसऱ्या टप्प्यात संरचनात्मक काम ज्यामध्ये भिंती, छत, रंगमंचाचा प्राथमिक आकार, प्रवेशद्वार याची उभारणी, तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावट, रंगरंगोटी, हॉलचे ध्वनिनियंत्रण, प्रकाशयोजना; तर चौथ्या व शेवटच्या टप्प्यात स्टेजची सुसज्जता, प्रकाशयोजना, ध्वनिप्रणाली, व्हिडीओ सिस्टम, प्रेक्षकांसाठी खुर्च्या व अतिरिक्त सुविधा हे काम अपेक्षित आहे.

गतवर्षी झालेल्या दुर्घटनेत हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. कोल्हापूरकरांशी जवळीक असलेल्या या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे वर्षभरात वेगाने पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील निविदेमुळे या वर्षअखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.