शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

Kolhapur: बास्केट ब्रीज, कागल उड्डाणपुलासाठी १०५० कोटी रुपयांची निविदा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:39 IST

काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे

सतीश पाटीलकोल्हापूर : पुलाची शिरोलीजवळील सांगली फाटा ते उचगावदरम्यान सुमारे ४,८०० मीटरपर्यंतच्या पिलरचा उड्डाणपूल व बास्केट ब्रिज आणि कागल येथे अडीच किलोमीटर चा उड्डाणपूल करण्याच्या प्रकल्पाची निविदा अखेर केंद्र शासनाने सोमवारी (दि. ३) केली. दोन्ही उड्डाणपुलांसाठी सुमारे १०५० कोटी रुपयांची निधी लागणार असल्याचे निवेदेत म्हटले आहे.भोपाळ येथील एल. एन. मलविया कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जून महिन्यात केंद्र शासनाला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला होता.पंचगंगा नदीवर बंधारा तयार होऊन पाण्याची फुगी वाढून नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका निर्माण होणार होता. यासाठी शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पूलदरम्यान महामार्गावर पिलरचा उडुाणपूल उभा करावा अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा देत पूरग्रस्त समितीने पंचगंगा नदीपुलाजवळ ठिय्या आंदोलन केले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनीसुद्धा ही मागणी उचलून धरली होती, त्यामुळे सांगली फाटा ते उचगावदरम्यान पिलरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी नवीन डीपीआर तयार केला आणि तो जूनमध्ये केंद्र शासनाकडे पाठवला, त्याची निविदा सोमवारी प्रसिद्ध झाली.शिरोली सांगली फाटा ते उचगाव दरम्यान ४,८०० मीटरचा पिलरवरील उड्डाणपूल कोल्हापूर शहरात जाण्यासाठी शिरोली सांगली फाटा येथून शिरोली जकात नाकापर्यंत बास्केट ब्रिज आणि कागल येथे अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल तसेच पंचगंगा नदीवरील पूल रेल्वे ब्रिज येथील पूल उभारण्यात येणार आहे. आता प्रतीक्षा टेंडरची असून, हे काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.'बास्केट ब्रीज'साठी ७५० कोटींची निविदाकागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिलरचे पूल आणि तावडे हॉटेल येथे बास्केट ब्रीजसाठी ७५० कोर्टीची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. निविदा भरण्याची अंतिम २ मुदत १९ डिसेंबर आहे. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

उड्डाणपूल 

  • शिरोली ते उचगाव उड्डाणपुलाची लांबी : ४८४१ मीटर
  • पंचगंगा नदीवर पूल,
  • रेल्वे उड्डाणपूल
  • कागल उड्डाणपूल : २६३४ मीटर
  • सांगलीहून कोल्हापूरला महामार्गावर येण्यासाठी ३४५ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
  • महामार्गावरून सांगली फाटा येथे उतरण्यासाठी २७० मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
  • कोल्हापूरहून महामार्गावरती येण्यासाठी २९५ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
  • महामार्गावरून कोल्हापुरात जाण्यासाठी ३०७ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
  • महामार्गावरून गांधीनगरला जाण्यासाठी २०९ मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
  • गांधीनगरवरून महामार्गावर येण्यासाठी ३०० मीटर लांबी आणि ८.५ मीटर रुंदी.
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: ₹1050 Crore Tender Announced for Basket Bridge, Kagal Flyover

Web Summary : Tender announced for Kolhapur's Shiroli-Uchgaon flyover, basket bridge, and Kagal flyover projects costing ₹1050 crore. The project aims to resolve flood concerns and improve connectivity, with work expected to begin soon.