दस साल बाद... परप्रांतीय पक्षांची साद
By Admin | Updated: January 20, 2017 01:11 IST2017-01-20T01:11:43+5:302017-01-20T01:11:43+5:30
वेध महापालिकेचे : स्वबळावर लढण्याची भाषा

दस साल बाद... परप्रांतीय पक्षांची साद
कोल्हापूर : कसबा बीडशेड (ता. करवीर) येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या ‘कोर्स आॅन कॉम्प्युटर कन्स्पेट (सीसीसी)’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार वडणगे (ता. करवीर) येथील अमर पाटील या युवकाने केली. याबाबत पोलिस प्रशासन, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स एवं सूचना प्रौद्योगिकी (नायलिट) यांच्याकडे आवश्यक ते पुरावे सादर करूनही न्याय मिळाला नसल्याची व्यथा पाटील याने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे बुधवारी मांडली.
याबाबत अमर पाटील याने सांगितले की, एमएससीआयटी अभ्यासक्रमाप्रमाणे केंद्र सरकार हे सीसीसी परीक्षा घेते. कसबा बीडशेड येथील एका शाळेत दि. ४ सप्टेंबर २०१६ रोजी परीक्षा घेण्यात आली. दुपारच्या सत्रातील या परीक्षेसाठी २० परीक्षार्थी होते. यामध्ये महिलांचा समावेश होता. परीक्षा कक्षामध्ये पेपर सोडविण्यासाठी काही विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. त्यांनी महिला परीक्षार्थ्यांमध्ये बसण्याचे असभ्य वर्तन केले. हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असल्याचे, काही विद्यार्थ्यांचे पेपर सोडवीत असल्याचे छायाचित्रीकरणात दिसून आले आहे. असे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते लक्षात घेऊन कसबा बीडशेडमधील या परीक्षेतील गैरप्रकारांची तक्रार दि. ९ सप्टेंबर २०१६ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि करवीर पोलिस ठाणे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. त्यासह ‘नायलिट’च्या दिल्ली व औरंगाबाद कार्यालयांना संबंधित गैरप्रकारांची माहिती लेखी स्वरूपात व व्हिडीओ फुटेजसह दि. १३ सप्टेंबरला ई-मेलद्वारे पाठविली. येथील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. या दरम्यान करवीर पोलिस ठाण्याने माझ्यासह ज्यांच्याविरोधात मी तक्रार केली होती, त्यांचे जबाब घेतले. मी तक्रारदार असूनदेखील माझा सुमारे २० वेळा जबाब घेतला आहे. यानंतर चौकशीअंती माझा तक्रार अर्ज निकालात काढला असल्याचे पत्र पोलिसांनी मला दि. १७ जानेवारी २०१७ रोजी दिले आहे. आवश्यक ते पुरावे सादर करूनही न्याय मिळविण्यासाठी झगडावे लागणे हे दुर्दैवी आहे. (प्रतिनिधी)
न्यायालयात दाद मागणार : पाटील
परीक्षेमधील गैरप्रकारांमुळे सीसीसी अभ्यासक्रमाचे नाव खराब होत असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते रोखण्यासाठी कसबा बीडशेडमधील गैरप्रकारांबाबत तक्रार करून न्यायासाठी लढत असल्याचे अमर पाटील याने सांगितले. करवीर पोलिस ठाणे ते मुंबई पोलिस आयुक्त आणि ‘नायलिट’कडे वास्तव मांडूनही न्याय मिळाला नाही; त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे.