गोकुळ शिरगावमध्ये चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:18 IST2021-06-06T04:18:40+5:302021-06-06T04:18:40+5:30

राहुल बंडोपंत मोरे (रा. रांगोळी, ता. हातकणंगले) श्रीधर हरिश्चंद्र नाईक (रा. कसनाळ, ता. निपाणी) असे अटक केलेल्या चोरट्यांची ...

Ten two-wheelers seized from thieves in Gokul Shirgaon | गोकुळ शिरगावमध्ये चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत

गोकुळ शिरगावमध्ये चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत

राहुल बंडोपंत मोरे (रा. रांगोळी, ता. हातकणंगले) श्रीधर हरिश्चंद्र नाईक (रा. कसनाळ, ता. निपाणी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकी कोल्हापूर परिसरातील असून या गाड्या चोरून आपण कमी दरात विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गच्‍चे, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक प्रणाली पवार, पोलीस हवालदार नितीन सावंत, शेख, प्रदीप जाधव, पोलीस नाईक युवराज कांबळे, सुहास संकपाळ, नीतेश कांबळे, राकेश माने, संदीप जाधव यांनी सहभाग घेतला.

फोटो : ०५ गोकूळ शिरगाव दुचाकी चोरी

गोकूळ शिरगाव पोलिसांनी दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या.

फोटो दुचाकी चोरटे

१)राहुल मोरे २)श्रीधर नाईक

Web Title: Ten two-wheelers seized from thieves in Gokul Shirgaon