शहरात दहा, ग्रामीण भागात पाच टक्क्यांनी दरवाढ

By Admin | Updated: January 1, 2015 00:25 IST2015-01-01T00:25:16+5:302015-01-01T00:25:51+5:30

रेडीरेकनरचे दर जाहीर : अधिकृतपणे आज समजणार

Ten percent in the city, five percent in rural areas | शहरात दहा, ग्रामीण भागात पाच टक्क्यांनी दरवाढ

शहरात दहा, ग्रामीण भागात पाच टक्क्यांनी दरवाढ

कोल्हापूर : बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) दरात सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरामध्ये दहा आणि ग्रामीण भागात पाच टक्क्यांनी दर वाढले आहेत. पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाकडून आज, बुधवारी दरवाढ जाहीर करण्यात आली. बाजारपेठेतील मंदीच्या वातावरणामुळे रेडीरेकनर यावेळी स्थिर राहील, तसेच दरवाढ झाल्यास ती पाच ते दहा टक्क्यांपर्यंत असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. नवीन रेडीरेकनरचे दर आज जाहीर झाले. त्यामध्ये शहरी भागांसाठी दहा, तर ग्रामीण भागासाठी पाच टक्क्यांनी दरवाढ केली आहे. या नवीन दरांची अंमलबजावणी उद्या, गुरुवारपासून होणार आहे. शिवाय जिल्ह्यातील निबंधक कार्यालयांमध्ये अधिकृतपणे परिसरनिहाय रेडीरेकनरची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, नवीन दर जाहीर होणार असल्याने त्यापूर्वी दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आजदेखील अनेकांची धावपळ सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Ten percent in the city, five percent in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.