इंग्रोळे महाविद्यालयाला दहा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:47+5:302021-03-25T04:22:47+5:30

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा विद्यालयामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहे. अशा या विद्यालयातील भौतिक सुविधा व गुणवत्ता वाढीकरिता ...

Ten lakh aid to Ingrole College | इंग्रोळे महाविद्यालयाला दहा लाखांची मदत

इंग्रोळे महाविद्यालयाला दहा लाखांची मदत

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा विद्यालयामार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहे. अशा या विद्यालयातील भौतिक सुविधा व गुणवत्ता वाढीकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. विद्यालयातील भौतिक सुधारणा घडवून

आणण्यासाठी रयत संस्थेकडून १० लाख रुपये देणगी स्वरूपात तसेच सरोज पाटील यांनी आपल्याकडील २५ हजार रुपये अशी रक्कम प्राचार्य बी. आर. भिसे यांचेकडे सुपुर्द केली. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अँथोनी डिसोझा १० हजार,जनरल बॉडी सदस्य राहुल इंग्रोळे ११ हजार रूपये,तसेच विद्यालयात सुरु असणाऱ्या अनेक शैक्षणिक उपक्रमांची प्रेरणा घेऊन इयत्ता सातवीमध्ये शिकत असणारा विद्यार्थी गुरुप्रसाद कोळी याने खाऊ करिता साठविलेल्या मिनी भिशी मधील जमलेली रक्कम मुख्याध्यापक भिसे यांच्याकडे सुपुर्द केली.

फोटो ओळी - रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी(ता. हातकणंगले) येथील शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसाण्णा इंग्रोळे महाविद्यालयामध्ये भौतिक सुविधा व गुणवत्ता वाढीकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील,नानासाहेब गाट,मानसिंग देसाई,डी एन मगदूम,बी आर माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Ten lakh aid to Ingrole College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.