तीनपानी जुगार खेळणारे दहा जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:31+5:302021-06-22T04:17:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : अटलबिहारी वाजपेयी चौक ते शाहू पुतळा या मार्गावर असलेल्या एका खानावळीमध्ये तीनपानी जुगार सुरू ...

Ten gamblers arrested | तीनपानी जुगार खेळणारे दहा जण ताब्यात

तीनपानी जुगार खेळणारे दहा जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : अटलबिहारी वाजपेयी चौक ते शाहू पुतळा या मार्गावर असलेल्या एका खानावळीमध्ये तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी समजली. त्यानुसार दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे ३९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.

चंद्रशेखर तुकाराम मांग (वय २५, रा. लालनगर), संदीप बाबूराव कोंडेकर (३३, रा. लिंबू चौक), तौफिक युसूफ राजन्नावर (२५, रा. आसरानगर), विकास मारुती ठोमके (२७, रा. कोरोची, ता. हातकणंगले), नागेश शिवाजी पेटकर (३९, रा. स्वामी मळा), मोहसीन झाकीर जमन्ना (२६, रा. आदर्श झोपडपट्टी), राजू सुरेश कांबळे (३६, रा. कोल्हापूर), विशाल अर्जुन पारसे (२३, रा. लालनगर), श्रीनिवास विजय मस्कर (२६, रा. मासाळ गल्ली) व महेश व्यंकटेश व्हन्नाळ (३४, रा. काडाप्पा मळा), अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण महेश व्हन्नाळ याच्या खानावळीमध्ये तीनपानी जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, प्लास्टिक टेबल, खुर्च्या व अन्य साहित्य असा ३९ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Ten gamblers arrested