हुपरीत दहा दिवस कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:26+5:302021-05-10T04:23:26+5:30
गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोनाबाधीत रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शहर धोकादायक क्षेत्रात(हॉट स्पॉट)दिसून येत असल्याने नगराध्यक्षा गाट ...

हुपरीत दहा दिवस कडक लॉकडाऊन
गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोनाबाधीत रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शहर धोकादायक क्षेत्रात(हॉट स्पॉट)दिसून येत असल्याने नगराध्यक्षा गाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पक्ष प्रतोद रफिक मुल्ला यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोरोना संसर्ग कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी देसाई यांच्याशीही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीमध्ये दवाखाने व औषध दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. दूध डेअरी तसेच शेतकरी,मजूर, शेतीची कामे करणाऱ्यांनी सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ८ या कालावधीतच कामासाठी बाहेर पडण्याचे आहे. सोमवार(ता.१०)अखेरपर्यंत शहरातील रेशन धान्य वाटप पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असणारे लसीकरण सुरू राहणार असून याबाबत सोशल मीडियावरून नावे तसेच अनुषंगिक माहिती दिल्यानंतरच दिलेल्या वेळेत नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांत जाऊन लस घेण्याची आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
---------::--------