तीन लाखांच्या विदेशी दारूसह टेम्पो जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:32+5:302021-09-26T04:25:32+5:30
कोल्हापूर : विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडला. यातील सुमारे तीन लाखांची दारू व ...

तीन लाखांच्या विदेशी दारूसह टेम्पो जप्त
कोल्हापूर : विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडला. यातील सुमारे तीन लाखांची दारू व चार लाख रुपये किमतीचा मिनी टेम्पो असा सुमारे सात लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर पुईखडी येथे केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर ते राधानगरी मार्गावरून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुईखडी टेकडी येथे हा मिनी टेम्पो संशयावरून आडवला. त्याची तपासणी केली असता या टेम्पोत विविध कंपन्यांची सुमारे तीन लाख एक हजार ५५७ रुपये किमतीची दारू होती. लक्ष्मीपुरीतील रोहित वॉईन्स येथे ही दारू भरून ती परिते येथे रामकृष्ण परमिट रूम येथे पोहोच करण्यासाठी जात असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दारूचा साठा जप्त केला, तर चालक यशवंत ज्ञानदेव कांबळे (वय ३६, रा. लोखंडे गल्ली, राजेंद्रनगर) याच्यासह रोहित वाईन्स शॉप (लक्ष्मीपुरी), रामकृष्ण परमिट रूम परिते यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले.
फोटो नं. २५०९२०२१-कोल-क्राईम०१
ओळ : विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पुईखडी परिसरात पकडला. यावेळी दारूसाठा व टेम्पो जप्त केला.
250921\25kol_2_25092021_5.jpg
ओळ : विनापरवाना विदेशी दारुची वाहतुक करणारा टेंम्पो पोलिसांनी पुईखडी परिसरात पकडला. यावेळी दारु साठा व टेंम्पो जप्त केला.