अवैध दारू वाहतूक करताना टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:32+5:302021-06-16T04:34:32+5:30
याप्रकरणी संतोष दिनकर तामगावे (वय ४१, रा. गांधीनगर, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. याबाबत फिर्याद पोलीस नाईक दादा ...

अवैध दारू वाहतूक करताना टेम्पो पकडला
याप्रकरणी संतोष दिनकर तामगावे (वय ४१, रा. गांधीनगर, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. याबाबत फिर्याद पोलीस नाईक दादा माने यांनी फिर्याद दिली.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, किणी पथकर नाक्यावर अवैध दारू इस्लामपूरला जाणार असल्याची माहिती वडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सापळा रचला होता. या वेळी विनापरवाना अवैध दारू वाहतूक करणारा चारचाकी टेम्पो (क्रमांक एमएच ०९ इएम ५६२१ ), किणी पथकर नाक्यावर आला असता, देशी-विदेशी दारूचे १ लाख ७० हजार किमतीची दारूचे ३० बाॅक्स मिळून आले. तर २ लाख ३० रुपये टेम्पो असा ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.
फोटो कॅप्शन : पेठ वडगाव : वडगाव पोलिसांनी किणी पथकर नाक्यावर अवैध दारू वाहतूक करताना दारू व टेम्पो ताब्यात घेण्यात आला. सोबत पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक नासीर खान, पोलीस उपनिरीक्षक.
0000