माणुसकीची मंदिरे चांगुलपणावरच उभारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:03+5:302021-01-03T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : समाजात काही वाईट गोष्टी जरूर आहेत. परंतु, सारा समाजच चांगला नाही, असे म्हणणे चुकीचे ...

माणुसकीची मंदिरे चांगुलपणावरच उभारतात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : समाजात काही वाईट गोष्टी जरूर आहेत. परंतु, सारा समाजच चांगला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. काही लोक, संस्था चांगुलपणा रुजविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कष्टातूनच समाजात माणुसकीची मंदिरे उभी राहतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे यांनी केले.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे माजी विद्यार्थ्यांनी शालेय मुलांसाठी सुरू केलेल्या ‘शिदोरी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ गर्जे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. गेवराई येथे अनाथ मुलांसाठी उभारलेल्या ‘बालग्राम’ची माहिती देताना त्यांनी स्वत:चा जीवनपटही उलगडला. विविध संस्थांच्या पदाधिकार्यांसह अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ, कौलगे, करंबळी येथील विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रीती गर्जे यांनीही मनोगत व्यक्त केेले. अवधूत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्नेहा घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले तर भाऊसाहेब माळवे यांनी आभार मानले.
-------
चौकट... ''''शिदोरी''''चे विद्यापीठ व्हावे...! शैक्षणिक क्षेत्रासमोर आज अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. शाळांचा लिलाव करण्याचेही प्रकार घडत आहेत. अशा परिस्थितीत ''''शिदोरी'''' हा उपक्रम आकाराला येत आहे.भविष्यात त्याचे रूपांतर विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणार्या विद्यापीठात व्हावे, अशी अपेक्षा
गर्जे यांनी व्यक्त केली.
-----------------------------------------
फोटोओळी अत्याळ ( ता. गडहिंग्लज ) येथे माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संतोष गर्जे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रिती गर्जे उपस्थित होत्या.