शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 11:59 IST

या प्रकल्पांना मिळणार सवलती

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांसाठी तेलगंणाने पायघड्या अंथरल्या आहेत. नवीन प्रकल्प सुरू करणाऱ्यांवर भांडवली अनुदान, व्याज अनुदान, कर परतावा, यासह विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या धरसोडीच्या आणि उदासीनतेच्या धोरणाला वैतागलेले अनेक उद्योजक तेलंगणात आपल्या उद्योगाचे स्थलांतर करण्याच्या किंवा तेथे नवा प्रकल्प सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनीही तेलंगणात आपला उद्योग सुरू करावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तेलंगणात केंद्र सरकारचा एक आणि राज्य सरकारचे नऊ, असे दहा टेक्स्टाइल पार्क उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांची गेल्याच आठवड्यात हैदराबाद येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत राव यांनी राज्य सरकारने देऊ केलेल्या सवलतींची माहिती दिली, तसेच वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी राज्य सरकार उद्योजकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक उद्योजकांनी तेलंगणात उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...या आहेत सवलती

  • कापड तयार करणाऱ्या पारंपरिक प्रकल्पाला एक कोटी रुपयांपर्यंत २५ टक्के भांडवली अनुदान. हीच मर्यादा तांत्रिक प्रकल्पासाठी (टेक्निकल टेक्स्टाइल) दोन कोटी रुपयांपर्यंत किंवा ३५ टक्के भांडवली अनुदान
  • प्रकल्पासाठीच्या कर्जावर २५ टक्के व्याज अनुदान.
  • व्हॅट, सीएसटी, एसजीएसटीचा परतावा सात वर्षांपर्यंत किंवा स्थिर भांडवली गुंतवणुकीएवढे उत्पन्न परत मिळेपर्यंत दिला जाणार.
  • प्रतियुनिट एक रुपया वीजदर सवलत.
  • स्टॅम्प ड्यूटी, ट्रान्स्फर ड्युटीही परत मिळणार.
  • कार्यालय किंवा प्रकल्पासठी भूखंड खरेदीत प्रतिएकर २० लाख रुपयांपर्यंत सवलत.
  • पर्यावरण रक्षण, ऊर्जा आणी पाणी या सुविधांसाठी ५० लाख रुपयांपर्यंत किंवा त्या उभारण्याकरिता लागणाऱ्या खर्चाच्या ४० टक्के मदत.

या प्रकल्पांना मिळणार सवलतीआधुनिक स्पिनिंग विव्हिंग मिल्स, डाॅइंग अँड प्रोसेसिंग, निटिंग, गारमेंट, कारपेटिंग, मशीन एम्ब्राॅयडरी, टेक्निकल टेक्स्टाइल्ससह वस्त्रोद्योगाच्या मूल्यवर्धित साखळीत समावेश असलेले कारखाने.                      

तेलंगणा सरकारने वस्त्रोद्योग उभारणीसाठी मोठ्या सवलती दिल्यामुळे उद्योजक तिकडे जाणार असतील तर ते गंभीर आहे. महाराष्ट्र सरकारने या उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सोडविल्या पाहिजेत. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाbusinessव्यवसाय