शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

देशाचं कल्याण होवू दे, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे अंबाबाईला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:30 IST

देवीच्या दर्शनाची इच्छा आज पूर्ण झाली. देशाची प्रगती होवू हे, जनतेचं कल्याण होवू दे असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळले.

कोल्हापूर : तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी सपत्नीक आज, गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनाची इच्छा आज पूर्ण झाली. देशाची प्रगती होवू हे, जनतेचं कल्याण होवू दे असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळले.तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव हे सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापूर विमानतळावर उतरले. साडे बारा वाजता अंबाबाईच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शोभाराव, खासदार संतोष, श्रावण रेड्डी, प्रधान सचिव अनिलकुमार होते. काही क्षणातच देवीची आरती सुरू झाल्याने त्यांना आरतीचा लाभ मिळाला. शंखतीर्थ होईपर्यंत जवळपास पाऊणतास मंदिरात होते.या दरम्यान त्यांनी मातृलिंगाचे देखील दर्शन घेतले. अंबाबाई मंदिराची माहिती घेतली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. दर्शनानंतर ते शनि मंदिर मार्गे मंदिराबाहेर आले.यानंतर चंद्रशेखरराव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही देवावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. बऱ्याच दिवसांपासून अंबाबाईचे दर्शन घेण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. अगदी प्रसन्न वाटले. देशाची प्रगती होवू हे, देशाचे आणि जनतेचे कल्याण होवू हे असे मागणं देवीकडे मांडल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTelanganaतेलंगणाChief Ministerमुख्यमंत्री