राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी संघ जाहीर
By Admin | Updated: February 26, 2015 00:47 IST2015-02-26T00:31:24+5:302015-02-26T00:47:32+5:30
जमशेदपूरमधील जेआरडी टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धा होणार आहेत

राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी संघ जाहीर
सांगली : जमशेदपूर (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग बेंचप्रेस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे.
जमशेदपूरमधील जेआरडी टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धा होणार आहेत. संघ असा : सब ज्युनिअर पुरूष (इक्वीप्ड) : सुफीयान शेख (मुंंबई), स्वप्नील तुळसनकर (रत्नागिरी), अमिर शेख (मुंबई उपनगर), अनिकेत धमाल (पुणे), अंबादास सुसलाडे व सुनिल गरोदे (दोघे अहमदनगर), दानिश शासरे (यवतमाळ), भावेश कोणकर (ठाणे), संग्राम साठे (पुणे). महिला : सोनल सावंत (कोल्हापूर), रिना गायकर (ठाणे), ऐश्वर्या ताटे (सातारा), सिध्दी शिंदे (कोल्हापूर), पौर्णिमा शिंदे (पुणे), अनुजा सावंत (रत्नागिरी), रिधीमा व्होरा (पुणे), रंक्षदा पाटील (रत्नागिरी). सिनिअर पुरूष (इक्वीप्ड) : विजय शिंदे (कोल्हापूर), महेश पेडमकर (मुंबई), राजेश परब व संतोष बुरटे (दोघे मुंबई उपनगर), रामदास खरात (ठाणे), इरफान शेख (पुणे), राकेश पाटील (अहमदनगर), अशफाक शेख (सातारा). महिला : मोहिनी सावंत (मुंबई), लक्ष्मी ठाणेकर (ठाणे), भक्ती आंब्रे (मुंबई), प्रियदर्शिनी जुगुष्टे (रत्नागिरी), नेहा ईराणी (मुंबई उपनगर). मास्टर्स पुरूष (अनइक्वीप्ड) : संजय शर्मा (पुणे), उमेश पुजारी (मुंबई उपनगर), रामचंद्र गावडे (मुंबई), गणेश झावडे व महेश बासुतकर (दोघे ठाणे). मास्टर्स महिला : मेधा खैरनार (ठाणे) व रजनी पाल (पुणे). संघ प्रशिक्षक : संजय सरदेसाई व संघ व्यवस्थापक : सूर्यकांत गर्दे. (क्रीडा प्रतिनिधी)