विद्यार्थ्यांची क्षमता पाहून शिक्षकांनी मार्गदर्शन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:13+5:302021-02-23T04:36:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क/ राधानगरी : बदलत्या परिस्थितीत सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढली आहे. इंटरनेटच्या सुविधेमुळे ज्ञानाचे भांडार खुले आहे. मात्र, ...

Teachers should guide students by looking at their abilities | विद्यार्थ्यांची क्षमता पाहून शिक्षकांनी मार्गदर्शन करावे

विद्यार्थ्यांची क्षमता पाहून शिक्षकांनी मार्गदर्शन करावे

लोकमत न्यूज नेटवर्क/ राधानगरी :

बदलत्या परिस्थितीत सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढली आहे. इंटरनेटच्या सुविधेमुळे ज्ञानाचे भांडार खुले आहे. मात्र, यातून नेमके काय निवडायचे, आपल्यासाठी काय योग्य आहे, हे ठरवण्यात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राधानगरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी केले. राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आयोजित गुणगौरव व सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, शिक्षक नेते कृष्णात कारंडे, विस्ताराधिकारी आर. आर. कुंभार उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक, पंच्याहत्तरी पूर्ण केलेले निवृत्त शिक्षक, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक तसेच सभासदांच्या शिष्यवृत्ती, दहावी, बारावी परीक्षेत गुणवत्ताधारक ठरलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शालेय उपयोगी बॅग व शिक्षकांना प्रवासी बॅग भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. बाळासाहेब पवार, कृष्णात कारंडे यांची भाषणे झाली. संस्थाध्यक्ष श्रीकांत कलिकते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विक्रम वागरे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अशोक वागरे यांनी आभार मानले.

ज्योतीराम पाटील, प्रमोद तौंदकर, रवळू पाटील, सतीश बरगे, रवींद्र बोडके, जीवन कांबळे, गणपती पाटील, संजय भोपळे, आनंदा मोगणे, सुरेश कोळी, डी. जी. पाटील, वर्षा केनवडे, दीपाली भोईटे, आर. जे. पाटील, पी. के. पाटील, दिलीप पाटील, सीताराम वागरे, नारायण आयरे, शाहू चौगुले, बी. जी. पाटील, पांडुरंग भोसले, सर्जेराव ढेरे, संतोष कांबळे, हरिदास वर्णे, सेवक शेटगे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ- राधानगरी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार. सोबत आर. आर. कुंभार, कृष्णात कारंडे, श्रीकांत कलिकते.

Web Title: Teachers should guide students by looking at their abilities