शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:56+5:302021-06-19T04:16:56+5:30
शिक्षण हक्क कायदा २००९ मधील कलम २३च्या तरतुदीनुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही परीक्षा ...

शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ द्यावी
शिक्षण हक्क कायदा २००९ मधील कलम २३च्या तरतुदीनुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी राज्य सरकारने ३१ मार्च २०१९ ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सुमारे आठ हजार प्राथमिक, माध्यमिक शिक्षक राज्यात आहेत. त्यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ मिळणे आवश्यक असल्याचे भरत रसाळे यांनी सांगितले. या समितीच्या शिष्टमंडळात आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, महादेव डावरे, बाळासाहेब लंबे, राजाराम हुल्ले, कुमार पाटील, अनिल सरक, सूर्यकांत बरगे, माच्छिंद्र नाळे, अनिल खोत, नाईक, अरुण गोते, अप्पासाहेब वागरे, राजेंद्र देशमुख, अतुल कुंभार यांचा समावेश होता.
फोटो (१८०६२०२१-कोल-शिक्षक सेवक समिती निवेदन) : शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.
===Photopath===
180621\18kol_3_18062021_5.jpg
===Caption===
फोटो (१८०६२०२१-कोल-शिक्षक सेवक समिती निवेदन) : शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.