शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान स्वीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:14+5:302021-07-03T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरगाव : कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षणाद्वारे गुणवत्ताधारक व संस्कारशील विद्यार्थी घडविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांनी स्वीकारावे, ...

शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान स्वीकारावे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरगाव : कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षणाद्वारे गुणवत्ताधारक व संस्कारशील विद्यार्थी घडविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांनी स्वीकारावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय डवर यांनी केले. सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथील हायस्कूलमध्ये शैक्षणिक उठाव अंतर्गत आयोजित अटल लॅब सुशोभीकरण व सत्कार समारंभप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. भैरवनाथ मंदिराचे व्यवस्थापन सदस्य व माजी कोतवाल विठ्ठल चौगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थापक व भोगावतीचे माजी चेअरमन माजी आमदार कै. गोविंदरावजी कलिकते प्रतिमापूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. एम. बी. कलिकते यांनी स्वागत केले, पत्रकार मधुभाऊ किरुळकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सहाय्यक शिक्षक ए. एल पाटील, शांताराम कांबळे, सुरेश पाटील, सानिया चौगले, नम्रता मोरस्कर, प्रणाली चौगले, आर्या चौगले, ओंकार निऊंगरे व कर्मचारी उपस्थित होते. एम. एस. किरुळकर यांनी सूत्रसंचालन केले तर ए. डी. गुरव यांनी आभार मानले.