शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दिरंगाई विरोधात शिक्षकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:42 IST

Teacher Kolhapur- राज्य शासन आणि कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दिरंगाईमुळे कोल्हापूर विभागातील १०९ कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी अपात्र ठरली आहेत. त्याच्या निषेधार्थ आणि ही महाविद्यालये अनुदानासाठी तातडीने पात्र ठरविण्यात यावीत, या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विनाअनुदानित शिक्षकांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देकायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा समितीचे आंदोलन कोल्हापूर विभागातील शिक्षकांचा सहभाग

 कोल्हापूर : राज्य शासन आणि कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दिरंगाईमुळे कोल्हापूर विभागातील १०९ कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी अपात्र ठरली आहेत. त्याच्या निषेधार्थ आणि ही महाविद्यालये अनुदानासाठी तातडीने पात्र ठरविण्यात यावीत, या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विनाअनुदानित शिक्षकांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली या शिक्षकांनी आंदोलन केले. अनुदान पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी सोमवारी शासनाकडून प्रसिद्ध झाली. त्यात राज्यातील कोल्हापूर आणि मुंबई वगळता अन्य विभागांमधील कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र-अपात्र याद्या जाहीर झाल्या.

कोल्हापूर विभागाची माहिती अप्राप्त अशी नोंद झाली आहे. येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मंत्रालयामध्ये योग्य स्वरूपात आणि निर्धारित वेळेत प्रस्ताव सादर झाले नसल्याने माहिती अप्राप्त अशी नोंद झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचा कोल्हापूर विभागातील विनाअनुदानित शिक्षकांनी यावेळी निषेध केला.

प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठविण्याची कार्यवाही करा, अशी मागणी करत त्यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. त्यावर मुंबई, पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सोनवणे यांनी, तर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जयंत आसगांवकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

संबंधित प्रस्ताव, आवश्यक माहिती तातडीने मंत्रालयात सादर करण्यात येईल, असे सोनवणे यांनी सांगितले. त्यानंतर या शिक्षकांनी आंदोलन थांबविले. सुमारे चार तास त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये कृती समितीचे राज्य सचिव सी. एम. बागणे, बाजीराव बर्गे, रावसाहेब पानारी, पांडुरंग चौधरी, राहुल चौगुले, एम. एम. पाटील, जयसिंग जाधव, आदी सहभागी झाले. दरम्यान, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दोन कर्मचारी आणि कृती समितीचे तीन पदाधिकारी हे मंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यासाठी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र