शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचाही 'मदती'चा तास; पूरग्रस्तांचे दुखः हलके करण्यासाठी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 16:06 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी  मदतीसाठी आवाहन केले आहे.

प्रदीप शिंदे, कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी वेगानं वाढत असताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय  यंत्रणा दिवसरात्र राबत आहे, त्यांची मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक संस्था, सामान्य नागरिक, तरूण ही मदतीला धावून आले असून यांच्यासह शिक्षकही मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी  मदतीसाठी आवाहन केले आहे.दोन लाख रूपये, दहा लांखाची वस्तू स्वरूपात मदत शिक्षकांच्याकडून मिळाली आहे. 

क्षणा क्षणाला वाढणारी पाणी पातळी. प्रापंचिक साहित्य पाण्यात तरंगतंय, लाईट नाही, पिण्याचे पाणी संपलेले. इतर मोबाईलची बॅटरीही संपले त्यामुळे संपर्क ही तुटलेला अशा परिस्थितीत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही गावांत पूरग्रस्तांची परिस्थिती आहे.  नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. शहरातील मंगल कार्यालये, शाळा पूरग्रस्तांसाठी खुल्या करण्यात आल्या असून, तेथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली आठ दिवस पाऊस काही कमी येईना पाणी पातळी संथ गतीने कमी होत असल्याने पूरग्रस्तांची स्थिती बिकट झाली आहे. 

पूरपरिस्थिती बिकट होत चाली आहे. आम्ही शिक्षक चळवळ या सोशल मीडियांच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. एक दिवसात रोख दोन लांख रुपये, दहा लांखाचे वस्तू रूपात मदत मिळाली, असे जेष्ठ शिक्षक भरत रसाळे यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना मदतीसाठी प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत मनपा शाळा व  प्राथमिक शाळा शिक्षक, सेवक व प्राथमिक शिक्षण समिती अधिकारी, कर्मचारी यांची मदत सुरू केली आहे.बागल चौकातील डायट कार्यालय बी टी कॉलेज येथे या साहित्यांचे वर्गीकरण करण्यात येत आहे.

वस्तू स्वरूपात कोरडे कपडे, अंथरून, टॉवेल्स,कोरडा खाऊ, टूथपेस्ट, टोथब्रश, साबण, तेल, सॅनिटरी नॅपकिन, डायपर, मेणबत्तीमाचीस,बादली इत्यादी विविध स्वरूपात साहित्य संकलन सुरू केले आहे.

काही तासांमध्ये मदतीचा ओघ...शिक्षकांनी सोशल मीडियांच्या माध्यमातून पूरग्रस्तासाठी मदतीचे अहवान केले. आणि अवघ्या काही तासामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला. याठिकाणी या वस्तूचे वर्गीकरण करण्यात येत आहे. 

संघटनेतील हवेदावे बाजूलाशिक्षक संघटना आपल्यामधील हवेदावे विसरून मदतीसाठी एक झाले आहेत. प्रत्येक जण आपल्या पध्दतीने नियोजन करत आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर