कास्ट्राईबतर्फे शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:42+5:302020-12-07T04:17:42+5:30
नामदेवराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे, बाजीराव प्रज्ञावंत, प्रमोद काकडे, ...

कास्ट्राईबतर्फे शिक्षकांचा गौरव
नामदेवराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे, बाजीराव प्रज्ञावंत, प्रमोद काकडे, प्रा. पवन गायकवाड, सदानंद दिघे, विश्वास सुतार उपस्थित होते.
यावेळी वसंत देसाई, गणपत गायकवाड, रामचंद्र माने, सुमन दीक्षित, बाळू कांबळे, महेश कांबळे, विद्याधर काळे, सतीश चिपरीकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच संविधानाची ३५ कलमे उपकलमासहित ६ मिनिटे ६ सेकंदात सादर केल्याबद्दल अनुप्रिया गावडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०६१२२०२० कोल कास्ट्राईब संघटना ०१
महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.