शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘जुन्या पेन्शन’साठी शिक्षक, शासकीय कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:10 IST

जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

ठळक मुद्दे‘जुन्या पेन्शन’साठी शिक्षक, शासकीय कर्मचारी रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन केले. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक अशा एकूण ३७५० शाळा बंद ठेवल्या. जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी या धरणे आणि संपामध्ये सहभागी झाले.राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समिती आणि राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या. आंदोलनकर्ते दुपारी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. रिमझिम पावसातही ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’, ‘सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर झाल्याच पाहिजेत’, अशा मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनस्थळी सभा घेण्यात आली.

 

यावेळी जुनी पेन्शन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,  कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार, खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, शिक्षक नेते दादा लाड, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, संभाजी बापट, अर्जुन पाटील, शीलाताई कांबळे, सविता गिरी, मारुती लांबोरे, रवि पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने दुपारी प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर