शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मतदार नोंदणीत पदवीधरापेक्षा शिक्षकच वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:04 IST

शिक्षकच राजकीयदृष्ट्या जास्त सजग असतात हे पुन्हा एकदा प्रत्ययास येत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी गतवेळेपेक्षा दोन हजारांनी जास्त झाली आहे, तर पदवीधरांना गेल्यावेळच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठीही अजून ४० हजार नोंदणीची गरज आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यातही प्रतिसाद कमीचजानेवारीपासून तिसरा अंतिम टप्पा सुरू होणार

कोल्हापूर : शिक्षकच राजकीयदृष्ट्या जास्त सजग असतात हे पुन्हा एकदा प्रत्ययास येत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी गतवेळेपेक्षा दोन हजारांनी जास्त झाली आहे, तर पदवीधरांना गेल्यावेळच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठीही अजून ४० हजार नोंदणीची गरज आहे.साधारणपणे एप्रिलमध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील आमदार निवडण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सातत्याने प्रबोधन करूनही अपेक्षित नोंदणी झालेली नाही. पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न मिळाल्याने पुरवणी यादीचा दुसरा टप्पा सुरूकरण्यात आला आहे. याची मुदत आता या महिनाअखेरला संपत आहे. त्यानंतर जानेवारीत तिसºया टप्प्यातंर्गत निवडणुकीची अधिसूचना निघेपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरूराहणार आहे.सातत्याने मुदतवाढ देऊनही नोंदणीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आजच्या घडीला झालेल्या नोंदणीनुसार पदवीधरपेक्षा शिक्षक मतदारसंघासाठी मात्र चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. गतवेळी ९६६२ इतके अंतिम मतदार होते, ती संख्या आता ११ हजार ८४५ वर पोहोचली आहे. गतवेळेपेक्षा ही वाढ २ हजार १८३ ने जास्त दिसत आहे.शिक्षकांमध्ये उत्साह असला तरी पदवीधरामध्ये मात्र निरुत्साह कायम दिसत आहे. गतवेळी १ लाख २० हजार ८०९ इतकी नोंदणी झाली होती. ती आता कशीबशी ८२ हजार ९६० वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात हीच संख्या ६९ हजार ८४२ इतकी होती. आठवडाभरात १३ हजार ११८ नी वाढ झाल्याचे दिसत आहे. ही चांगली बाब असली तरी एकूणच पदवीधरांचा निरुत्साह पाहता गतवेळी इतका १ लाख २० हजारांचा आकडा गाठण्यासाठी अजून ४० हजार जणांची नोंदणी करण्याचे आव्हान आहे.पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघात डझनभर इच्छुक आहेत. त्यांनी नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लावली आहे, तरीही नोंदणी वाढत नसल्याने त्यांच्याही गोटात सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. ही निवडणूक पसंतीक्रमानुसार होत असल्याने पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मते घेण्यावर उमेदवारांचे लक्ष असते. मतदारच कमी आणि उमेदवार जास्त असल्यामुळे मतविभागणीची मोठ्या प्रमाणावर झळ बसणार असल्याने पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील आमदारकी लढविणे आता सोपे राहिलेले नाही. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर