शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'गुरुजी'ची यंदा शंभर टक्के हजेरी; कोल्हापूर जिल्ह्यात सर्व रिक्त पदांवर शिक्षक नियुक्ती

By भीमगोंड देसाई | Updated: May 30, 2024 15:47 IST

..तर कदाचित संबंधित शिक्षकास अतिरिक्त होण्याचीही वेळ येणार

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांतील सर्व रिक्त पदांवर शिक्षक नियुक्त होणार आहेत. परिणामी वाड्या, वस्त्यांतील सर्व विद्यार्थ्यांना गुरुजी मिळणार आहेत. शासनाने नव्याने निवडलेल्या ५६३ शिक्षकांनाही रुजू होणार असल्याने रिक्त शिक्षकांच्या सर्व जागा भरणार आहेत. दरम्यान, आता सुरू असलेल्या बढती, बदलीत बुधवारी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या एकूण ९०० जागा रिक्त राहणार आहेत. पण नव्याने येणारे शिक्षक आणि बदली, बढतीतून या रिक्त जागा भरणार आहेत. यामुळे सोयीची नाही म्हणून शाळा नको म्हटले तर कदाचित संबंधित शिक्षकास अतिरिक्त होण्याचीही वेळ येणार आहे.जिल्ह्यांतर्गत बदलीतून राज्यातील विविध जिल्ह्यांतून २०५ शिक्षक येणार आहेत. आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून १५ शिक्षक रुजू झाले आहेत. अजून सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतून शिक्षक येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यांतून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असणाऱ्या ४० शिक्षकांना येथून पदमुक्त करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर १९ जूनला नवनियुक्त ५६३ शिक्षकांना पदस्थापना मिळणार आहे. हे नवीन शिक्षक येणार असल्याने सेवानिवृत्ती, बढती, बदलीने रिक्त होणाऱ्या सर्व जागा भरणार आहेत. परिणामी दुर्गम भागातील प्राथमिक शाळांनाही शिक्षक मिळणार आहेत.प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दुर्गम भागातील पालक, शिक्षक मागणीसाठी तालुका, जिल्हा परिषद ते लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारतात. पण यंदा शासनाने नियुक्त केलेले ५६३ शिक्षक एकावेळी मिळणार आहेत. परिणामी रिक्त जागांचा सर्व अनुशेष भरून निघणार आहे. वर्षानुवर्षे शिक्षकांसाठी आस लावून बसलेल्या वाड्या, वस्त्यांतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनाही गुरुजी मिळणार आहेत. यामुळे आतापासूनच काही शिक्षक सोयीच्या शाळा मिळण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. यातूनच गेल्या दोन दिवसांपासून प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक नेत्यांची वर्दळ वाढली आहे.

  • जिल्ह्यातील एकूण शाळा : १९६४
  • कार्यरत शिक्षक : ६ हजार
  • बदलीसाठी इच्छुक : ३ हजार
  • नव्याने रुजू होणारे शिक्षक : ५६३

सर्वाधिक करवीर तालुक्यातसध्या रिक्त असलेल्या शिक्षकांची तालुकानिहाय संख्या अशी :करवीर : १०२, चंदगड : ७९, शाहूवाडी : ७६, राधानगरी : ७५, हातकणंगले : ६५, शिरोळ : ६५, भुदरगड : ५४, पन्हाळा : ४९, कागल : ४९, गडहिंग्लज : २६, आजरा : २५, गगनबावडा : ११.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकSchoolशाळा