शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

शिक्षक, पदवीधरचा गुलाल उद्याच : अरुण लाड, जयंत आसगावकर यांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:18 IST

Vidhan Parishad Election, pune, kolhapurnews, voting पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने व अटीतटीने पहिल्यांदाच मतदान झाल्याने निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, गुरुवारी  पुणे येथे मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. उमेदवारांची संख्या, त्यात पसंती क्रमांकामुळे मतमोजणीला उशीर लागणार असून, गुलालासाठी उद्या, शुक्रवारची प्रतीक्षा उमेदवारांसह समर्थकांना करावी लागणार आहे.

ठळक मुद्देशिक्षक, पदवीधरचा गुलाल उद्याच : अरुण लाड, जयंत आसगावकर यांची आघाडी उमेदवारांची संख्या, पसंती क्रमांकामुळे मतमोजणी लांबणार

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने व अटीतटीने पहिल्यांदाच मतदान झाल्याने निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, गुरुवारी  पुणे येथे मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. उमेदवारांची संख्या, त्यात पसंती क्रमांकामुळे मतमोजणीला उशीर लागणार असून, गुलालासाठी उद्या, शुक्रवारची प्रतीक्षा उमेदवारांसह समर्थकांना करावी लागणार आहे.

पुणे पदवीधर मतमोजणीला दुपारी वाजता सुरुवात झाली असून प्रथम पसंतीची मतमोजणी सुरु झाली आहे. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मुसंडी मारली असून भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी आघाडी घेतली आहे. पुणे पदवीधरसाठी यावेळेला ६२ जण रिंगणात होते. नोंदणीपासून मतदानापर्यंत येथे चुरस पाहावयास मिळाली. तब्बल २ लाख ४५ हजार २५५ मते झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक ६० हजार ९६४ मते नोंदली गेली. ह्यशिक्षकह्णमध्ये ३५ जणांनी आपले नशीब आजमावले. येथे पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर निवडणूक लढविली गेल्याने प्रचंड ईर्षा पाहावयास मिळाली. येथे ५२ हजार ७११ मते झाली असून, यामध्ये १० हजार ६०९ मते ही कोल्हापुरातील आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा राबविली होती. त्यामुळे येथे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यात शिक्षकमधून प्रा. जयंत आसगावकर हे स्थानिक उमेदवार असल्याने उत्कंठा ताणली आहे. आज मतमोजणी सुरू झाली असली तरी उमेदवारांची संख्या व पसंती क्रमांकांमुळे मोजणीस वेळ लागणार आहे. पहिल्या पसंतीची मते मोजण्यासाठी रात्री आठ वाजतील. साधारणता संपूर्ण निकाल लागण्यासाठी शुक्रवार उजाडणार हे निश्चित आहे.पहिल्या पसंतीत कोटा अशक्यचपदवीधरसाठी १ लाख २२ हजार ६२८, तर शिक्षकसाठी २६ हजार ३५६ मतांचा कोटा आहे. मात्र, निवडणुकीतील चुरस व मतांसाठी लावलेल्या जोडण्या पाहता पहिल्या पसंतीत कोटा पूर्ण करताना दमछाक होणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत चौथ्या फेरीपर्यंत झुंजावे लागण्याची शक्यता आहे.सामान्य माणसातही उत्सुकताप्रचाराच्या निमित्ताने पहिल्यांदाच सामान्य माणूस थेट या निवडणूकीत सहभागी झाला होता. त्यामुळे निकालाविषयी सामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPuneपुणेkolhapurकोल्हापूरVotingमतदान