ज्येष्ठ गिरवतात स्मार्ट फोनचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:09 IST2019-02-25T00:09:42+5:302019-02-25T00:09:46+5:30
प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अवघे जग सामावणारी क्षमता असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपला नातेवाइकांसह जुन्या ...

ज्येष्ठ गिरवतात स्मार्ट फोनचे धडे
प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अवघे जग सामावणारी क्षमता असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपला नातेवाइकांसह जुन्या सवंगड्यांशी संवाद राहावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आपल्याकडे स्मार्ट फोन असावा असे वाटते. मात्र, तो कसा वापरायचा हेच माहीत नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत असते. ही खंत दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, ऊर्जा फौंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी ‘स्मार्ट फोनचे धडे’ गिरविले जात आहेत.
विरंगुळा म्हणून गाणी ऐकणे, गेम खेळणे, आवडीचे फोटो, माहिती शेयर करण्याचे मुख्य साधन स्मार्ट फोन आहे. मात्र, अनेक ज्येष्ठांना किरकोळ गोष्टींसाठी कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. हीच खंत दूर करण्यासाठी ‘स्मार्ट फोन साक्षर’ उपक्रम सुरू केला आहे.
आॅनलाईन बुकिंगचेही ज्ञान
‘स्मार्ट फोनचे धडे’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठांसाठी पंधरा दिवसांचे दररोज दुपारी चार ते पाच या वेळेत मोफत पंधरा दिवसांचे ट्रेनिंग दिले जाते.
यामध्ये मोबाईलवरून फोन लावणे, नंबर सेव्ह करणे, मेसेज पाठविणे, सोशल मीडियाचा वापर, लाईट बिल भरणे, रेल्वे, एस. टी.चे तिकीट बुकिंग करणे अशा गोष्टी शिकविल्या जात असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकारिणी सदस्य सुरेश मिरजकर यांनी सांगितले.