‘गोकुळ’ मल्टीस्टेट करू पाहणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST2021-04-15T04:23:58+5:302021-04-15T04:23:58+5:30

(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे; मात्र ...

Teach a lesson to those who want to multistate ‘Gokul’ | ‘गोकुळ’ मल्टीस्टेट करू पाहणाऱ्यांना धडा शिकवा

‘गोकुळ’ मल्टीस्टेट करू पाहणाऱ्यांना धडा शिकवा

(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे; मात्र सत्तारूढ गटाने मल्टीस्टेटच्या आडून स्वत:च्या ताब्यात ठेवण्याचा डाव रचला होता; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या साथीने हा डाव हाणून पाडला, अशा स्वार्थी प्रवृत्तीला धडा शिकवा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ठरावधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, सामान्य दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर आहेत. गोरगरिबांचा दूध संघ वाचवण्यासाठी गेली सहा वर्षे सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष केला. त्यामुळे या निवडणुकीत सभासदांना मताचा अधिकार अबाधित राहिला. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी अत्यंत कष्टातून संघाची उभारणी करून नावलौकिक मिळवून दिला; मात्र काही व्यापारी प्रवृत्ती ‘गोकुळ’ मध्ये घुसल्या आणि त्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी ‘गोकुळ’ स्वत:च्या मालकीचा रहावा, यासाठी मल्टीस्टेटचा घाट घातला. त्यांनी मोठ्या ताकदीने त्यासाठी प्रयत्न केले; मात्र जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळावर लढा उभारून तो यशस्वी केला. हा लढा अजून संपलेला नाही. या प्रवृत्तीला ‘गोकुळ’मधून कायमचे हद्दपार करूया, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

Web Title: Teach a lesson to those who want to multistate ‘Gokul’